सहकार महर्षी स्व. माणिकराव पालोदकर जयंती उत्साहात

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) येथे सहकार महर्षी तथा माजी मंत्री स्व. माणिकराव (दादासाहेब) पालोदकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पजयंतीनिमित्त शहरातील सहकार महर्षी स्व. माणिकराव (दादासाहेब) पालोदकर मार्ग येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते स्व. माणिकराव पालोदकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनीं उपस्थितांशी संवाद साधत स्व. माणिकराव पालोदकर यांच्या सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाला उजाळा दिला.

याप्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, माजी सभापती रामदास पालोदकर, शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका राजश्री निकम, शहराध्यक्ष मेघा शाह, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, माजी उपनगराध्यक्ष विनोद मांडवे, युवासेना पदाधिकारी शिवा टोम्पे, नगरसेवक सुधाकर गायकवाड, जितू आरके, अशोक बनसोड, ज्ञानेश्वर कुदळ, सुनील लांडगे, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र बापू पाटील, संचालक शंकरराव खांडवे, राजेंद्र ठोंबरे, अनिल पालोदे, रमेश ठाकूर, रवी गायकवाड, संतोष घाडगे, विजय खाजेकर, प्रफुल्ल होणे, आशिष कुलकर्णी, गणेश डोईफोडे, संदीप हाडोळे, फईम पठाण, जगन्नाथ कुदळ, कृष्णा वाघ, आत्माराम अग्रवाल, भाऊराव दुधे, गणेश शेलार, आनंद शिरसाट, गणेश बावस्कर, सुनील काळे, सिताराम कुदळ, देवराव भाग्यवंत, विनोद पैठणकर, मनोज चंदनसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.